ऊस लागवड तंत्र कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे आधुनिक मार्ग – 2025

प्रस्तावना (Introduction) :- ऊस लागवड तंत्र शेती मार्गदर्शन-Sugarcane cultivation techniques farming guidance

ऊस लागवड तंत्र (Sugarcane cultivation techniques ):- उस हा भारतातील सर्वात महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू हे प्रमुख ऊस उत्पादक राज्य आहेत पण या सर्वा मध्ये महाराष्ट्र हे सर्वात जास्त उस उत्पादक राज्य आहे. ऊसापासून साखर, गूळ, इथेनॉल, कागद व पशुखाद्य तयार केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस शेतीमुळे स्थिर आणि मोठे उत्पन्न मिळते. ऊस लागवड प्रामुख्याने भारत, चीन आणि ब्राझील मध्ये होते, ब्राझील हा सर्वात जास्त उस उत्पादक देश आहे. उस हे वार्षिक पीक आहे तसेच उसाला कसदार काळी जमीन लागते कारण कि कसदार जमिनीमध्ये पोषकद्रवे असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, ऊस लागवड तंत्र(Sugarcane cultivation techniques ) सुरु करणे आवश्यक आहे.

या मार्गदर्शनात आपण ऊस लागवड तंत्र (Sugarcane cultivation techniques )पद्धत, जमिनीची तयारी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण आणि नफा वाढवण्याचे उपाय पाहणार आहोत.

उस लागवड तंत्र (Sugarcane cultivation techniques ) :- ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे, ऊस लागवड तंत्र म्हणजे नवनवीन तंत्रज्ञानचा अवलंब करणे आणि शेती व्यवसायामध्ये प्रगती साधने हा आहे, आम्ही तुम्हला ह्या लेखा मध्ये हेच सांगणार आहोत कि ऊस लागवड तंत्रज्ञान का गरजेचे आहे.

1️  जमिनीची निवड आणि तयारी -Land selection and preparation

ऊस लागवड तंत्र मार्गदर्शन

  • जमीन प्रकार: गाळमिश्रित, काळी किंवा लाल माती ऊसासाठी उत्तम. पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी, सेंद्रिय पदार्थ (Organic Matter) असलेली जमीन निवडा.
  • pH Range: जमिनीचा pH (सामू) ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
  • नांगरणी: खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. खोल नांगरट, कुळवणी आणि जमीन सपाट करणे.
  • खत मिसळणे: शेणखत/कंपोस्ट (20-25 टन/हे.) नांगरणीवेळी मिसळावे.
  • हवामान: उसाला उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते. वाढीसाठी २०°C ते ३२°C तापमान योग्य. ऊसावर हवामानातील तापमानआर्द्रता, पर्जन्यमान आणि सुर्यप्रकाश या घटकांचा परिणाम होतो. ऊस लवकर उगवणीसाठी वातावरणातील तापमान १० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी नसावे.

2️  उस लागवड तंत्र पद्धती -Sugarcane Cultivation Techniques

  • कालावधी: सुरूवातीचा ऊस (Pre-season): ऑक्टोबर – नोव्हेंबर
  • हंगामी ऊस (Seasonal): जानेवारी – फेब्रुवारी
  • अखेरचा ऊस (Adsali): जून – जुलै
  • बीज साहित्य: रोगमुक्त, 2-3 गाठीचे ऊस खोड (Setts) वापरावे.
  • सुधारित वाण (Improved Varieties): महाराष्ट्रासाठी शिफारस केलेले लोकप्रिय वाण आणि त्यांचे वैशिष्ट्ये:- को. ८६०३२ (Co. 86032): सर्वाधिक लोकप्रिय, जास्त साखर उतारा.को.एम. ०२६५ (CoM 0265): नवीन वाण, रोगप्रतिकारशक्ती चांगली.
  • लागवड पद्धती: सरळ सऱ्या: पारंपारिक पद्धत, पट्टा पद्धत (Broad Bed Furrow – BBF): पाण्याचा चांगला निचरा होण्यास मदत,ट्रेन्च पद्धत (Trench Method): जास्त उत्पादन आणि यांत्रिक काढणीसाठी उत्तम.
  • बीजप्रक्रिया (Set Treatment): लागवडीपूर्वी बुरशीनाशक (Fungicide) आणि कीटकनाशकाची (Insecticide) बीजप्रक्रिया करणे आवश्यक.
  • लागवडीचे अंतर: वाण आणि पद्धतीनुसार योग्य अंतर ठेवा (उदा. BBF मध्ये ४ ते ५ फूट अंतर)
  • अंतर: ओळीतील अंतर → 90–120 सेमी,गाठीतील अंतर → 15–20 सेमी
  • लागवड पट्टा पद्धतीत २.५ फूट किंवा ३ ६ फूट अंतरावर केल्यास उसाची वाढ जोमदार होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • उसाची लागवड करण्याअगोदर रोग व कीडप्रतिबंधक उपाय म्हणून १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम आणि ३०० मि.लि. मॅलेथिऑन प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करतात. त्यामध्ये टिपरी १० ते १५ मिनिटे बुडवून नंतरच लागण करतात.
  • उसाची लागण करतेवेळी आडसाली उसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश देतात. पूर्वहंगामामध्ये हेक्टरी ३४० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश देतात. खतमात्रा मातीपरीक्षणानुसारच देणे योग्य असते. या शिफारशीत खतमात्रेमधून लागवडीच्यावेळी दहा टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद आणि ५० टक्के पालाश या प्रमाणात देतात. उरलेली खते (स्फुरद व पालाश) मोठ्या बांधणीवेळी देतात. नत्राची ४० टक्के मात्रा ४५व्या दिवशी, दहा टक्के मात्रा ९०व्या दिवशी आणि ४० टक्के मात्रा मोठ्या बांधणीवेळी देतात, तसेच सल्फर या खताची मात्रा लागणीवेळी ६० किलो प्रति हेक्‍टरी शेणखतात मिसळून देतात.

3️ ऊस लागवड तंत्र खत व्यवस्थापन -Sugarcane cultivation techniques Fertilizer management

  • जैविक खत: कंपोस्ट/शेणखत = 25 टन/हे.
  • रासायनिक खत (NPK): नायट्रोजन = 250 किलो/हे. फॉस्फरस = 115 किलो/हे. पोटॅश = 115 किलो/हे.
  • मायक्रोन्यूट्रिएंट्स: झिंक, मॅग्नेशियम, गंधक यांची फवारणी उपयुक्त.
  • रासायनिक खते: नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) योग्य प्रमाणात द्या.
  • शिफारस केलेला डोस (Recommended Dose) तीन टप्प्यांमध्ये (लागवडीच्या वेळी, फुटवे फुटताना आणि वाढीच्या वेळी) विभागून द्या.

4️ ऊस लागवड तंत्र पाणी व्यवस्थापन-Sugarcane cultivation techniques water management उसाच्या  शेता मध्ये शेतकरी पाहणी करताना   उस लागवड तंत्र

  • ऊस हे जास्त पाणी घेणारं पीक आहे.
  • Drip Irrigation वापरल्यास 40% पाणी वाचतं आणि 20–25% उत्पादन वाढतं.
  • उन्हाळ्यात दर 7 दिवसांनी, हिवाळ्यात दर 12–15 दिवसांनी पाणी द्यावे. उस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकर्यांनी ठिबक सिंचन किंवा रेनगण पाणी व्यवस्थान पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
  • ठिबक सिंचन (Drip Irrigation): पाण्याची बचत करण्यासाठी आणि थेट मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सर्वोत्तम पद्धत.

5️ उस लागवड तंत्र कीड व रोग नियंत्रण -Sugarcane cultivation techniques, pest and disease control

  • मुख्य कीड: पांढरी माशी (Whitefly) टोककुंडी कीड (Top borer) खोडकिडा (Stalk Borer) आणि पानांवरील किडी (Sucking Pests): ओळख आणि नियंत्रण.
  • नियंत्रण: ट्रायकोग्रामा परजीवी कीटक सोडणे, कीटकनाशकाची फवारणी.
  • मुख्य रोग: लाल कुज (Red rot) गव्हई रोग (Smut) तांबेरा (Rust) आणि काणी (Smut) यांसारख्या सामान्य रोगांची लक्षणे आणि त्यावर नियंत्रण
  • नियंत्रण: रोगमुक्त वाण वापरणे, गंधक/तांब्या मिश्रित औषधे वापरणे. एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): रासायनिक आणि जैविक पद्धतींचा योग्य समन्वय साधने आणि यौग्य ती काळजी घेण जे ने करून रोग नियंत्रण लवकर करता येईल.

6️ ऊस लागवड तंत्र उत्पादन वाढवण्याचे आधुनिक उपाय -Sugarcane cultivation techniques: Modern solutions to increase production

  • सुधारित वाण वापरा (Co-86032, Co-0238, Co-7219).
  • ऊस लागवडीमध्ये यंत्रसामग्रीचा वापर वाढवावा.
  • ऊस लागवडीसाठी उच्च उत्पादक वाण (Varieties) वापरावेत.
  • मल्चिंग आणि इंटरक्रॉपिंगने उत्पादन वाढते.
  • वेळोवेळी माती व पाणी चाचणी करावी.
  • ठिबक सिंचन + आंतरमशागत वापरा.
  • सेंद्रिय + रासायनिक खतांचा संतुलित वापर करा.
  • आंतरपीक (डाळी, सोयाबीन, भाजीपाला) घेतल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळते.

7️ ऊस लागवडीचा खर्च व नफा-Cost and profit of sugarcane cultivation

  • साधारण उत्पादन: 80–100 टन/हे.
  • सरासरी प्रति एकर लागवड खर्च ₹60,000 – ₹80,000.
  • ड्रिप सिंचन व सुधारित वाणाने: 120–140 टन/हे.
  • नफा: एका हेक्टरमागे ₹1.5 – ₹2 लाख (हंगामानुसार बदलू शकतो).
  • काढणी आणि बाजारपेठ (Harvesting and Market) : काढणीची वेळ  ऊस पक्व झाल्यावर, साखर उतारा (Sugar Recovery) सर्वाधिक असताना काढणी करा. (साधारणतः १२ ते १८ महिन्यांनी). उसाची तोडणी हंगामनिहाय व पक्वता पाहून करावी. तोडणीपूर्वी पिकाचे पाणी १५ दिवस बंद करावे. तोडलेला ऊस ताबडतोब गळीतास पाठवावा. सुरु १२-१३ महिने, पूर्वहंगामी १४-१५ महिने आणि आडसाली १६-१८ महिन्यात ऊस तोडणी करावी.
  • बाजारपेठ: साखर कारखाने आणि गूळ उद्योगांना ऊस विकणे.

8️ उस लागवड तंत्र शेती सरकारी योजना व सबसिडी -Sugarcane cultivation techniques Agriculture Government schemes and subsidies

शेता मध्ये ठिबक द्वारे उसाला पाणी देताना उस  उत्पादन तंत्र

  • ठिबक सिंचनावर 50–70% अनुदान.
  • ऊस लागवड तंत्र प्रोत्साहन योजना.
  • इथेनॉल उत्पादनासाठी सरकार प्रोत्साहन देते.
  • PMKSY – पंतप्रधान कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन अनुदान)-सूक्ष्म सिंचनासाठी (ठिबक/स्प्रिंकलर) सरकारी अनुदानाबद्दल संपूर्ण माहिती पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर वाचा—https://pmksy.gov.in
  • माती आरोग्य कार्ड योजना (माती चाचणी अहवाल)-माती चाचणी अहवाल, पोषक तत्वांचा समतोल आणि खतांच्या शिफारसी पाहण्यासाठी, माती आरोग्य कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या—https://soilhealth.dac.gov.in

शेतकऱ्यांनी mahadbtportal किंवा स्थानिक कृषी कार्यालयातून अर्ज करावा.

निष्कर्ष (Conclusion)

ऊस लागवड तंत्र (Sugarcane cultivation techniques)हा नफा देणारा पण नियोजन आवश्यक असलेला व्यवसाय आहे.ऊस लागवड शेती ही मेहनतीची शेती असली तरी योग्य जमिनीची निवड, सुधारित वाण, ठिबक सिंचन व वैज्ञानिक पद्धतीने केलेली लागवड यामुळे शेतकरी जास्त नफा मिळवू शकतात.

योग्य शेती पद्धती + सरकारी योजना + मार्केट माहिती = यशस्वी ऊस शेतकरी”

२०२५ मध्ये आधुनिक शेतीचा अवलंब करून, शेतकरी कमी खर्चात जास्त ऊस उत्पादन मिळवू शकतील.
जर वरील उपाययोजना योग्यरित्या अंमलात आणल्या तर तुमची शेती अधिक फायदेशीर होईल

तुम्ही हा लेख वाचून काय शिकलात, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!

हा लेख उपयुक्त वाटल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या शेतकरी मार्ग ब्लॉगला Subscribe करा https://shetkarimarg.com

ऊस लागवड तंत्र मार्गदर्शन २०२५